Share

“हनुमान चालिसाचे पठण करा बोलणारे आता शरद पवार यांच्या नावाचे…”, राष्ट्रवादीचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र नवनीर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल (१ मे) औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सुरू झालेला जातीय द्वेष, मशिदीवरील भोंगे आणि इतर काही मुद्द्यांवर भाष्य केले. दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणानंतर राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी काल झालेल्या सभेविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात क्लाईड क्रास्टो यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,‘हनुमान चालिसाचे पठण करा बोलणारे आता आदरणीय शरद पवार साहेबांच्या नावाचे पठण करत आहेत.’ तसेच भोंगे काढा बोलून बोलून स्वतः भाजपचे भोंगे झाले आहेत, ‘राज भाषा’ की ‘राज भाजपा’ ?, असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, ‘शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच अ‍ॅलर्जी असून प्रत्येकवेळी भाषणात बोलताना शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेतात. महाराष्ट्र हा शाहू, फुले आणि आंबेडकरांचा आहेच. पण त्याआधी महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर हे शिवाजी महाराजांचाच विचार घेऊन पुढे गेले.’ तसेच शरद पवार शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाहीत, हे मी सांगितल्यानंतर सगळे बोलायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत शिवाजी महाराजांचा फोटो नसतो. आता मी बोलल्यानंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर छत्रपतींची प्रतिमा दिसायला लागली. मी जात मानत नाही. मला जातीशी देणेघेणे नाही. मी याठिकाणी ब्राह्मणांची बाजू घेण्यासाठी उभा नाही’, अशी टीका राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!