Share

“भाडोत्री गर्दी ‘भ्याड’ वक्ता अन् सतरंजी उचलायला…”, शिवसेनेचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईतील सोमय्या मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्ताने सन्मान सोहळा पार पडला. यावेळी बोलत असताना भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी देवेंद्र फडणवीसांचे सभेतील भाषण नाकर्त्या ठाकरे सरकारवर कोरडे ओढणारे होते, अशी टीका केली आहे. दरम्यान, भातखळकरांच्या या टीकेला आता मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरूखकर (Sheetal Sheth-Devrukhkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच भाडोत्री गर्दी ‘भ्याड’ वक्ता अन् सतरंजी उचलायला मंबु ‘प्रवक्ता’, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

यासंदर्भात शीतल यांनी ट्विट केले असून त्या म्हणाल्या आहेत की,‘स्वतःचा नाकर्तेपणा लपवायला अर्धांगिनिला पुढे करणारे देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांनी बाबरी पाडली,कदाचित ती बाबरी म्हणजे त्यांची सत्ता असावी.’ तसेच भाडोत्री गर्दी “भ्याड” वक्ता अन् सतरंजी उचलायला मंबु “प्रवक्ता” अतुल भातखळकर हुंगत रहा पायतणं, अशी घणाघाती टीका शीतल यांनी केली आहे.

दरम्यान, ‘सोमय्या मैदानात आज महाराष्ट्र दिनी भाजपच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी भ्रष्ट महाराष्ट्र द्रोह्यांच्या उरात धडकी भरवणारी होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे या सभेतील भाषण नाकर्त्या ठाकरे सरकारवर कोरडे ओढणारे होते. भाजपने आज संघर्षाची तुतारी फुंकली’, असे अतुल भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!