Share

“पैसे देऊन नागरिकांना…”, राज ठाकरेंच्या सभेवर चंद्रकांत खैरे यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : आज (१ मे ) महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असून या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असतांना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना चंद्रकांत खैरे म्हणाले की,‘औरंगाबाद हा शिवसेनेचा गड असून हा गड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला आहे. शिवसेनेची पानिपत करण्याची हिम्मत कोणा मध्येच नाही, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची बरोबरी कोणीही करू नये.’ तसेच सभेसाठी भाजप मदत करत असून या सभेसाठी पैसे देऊन नागरिकांना सभा ऐकण्यासाठी बोलवण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या सभेला किती जरी नागरिक आले तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही कारण औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील, असेही खैरे म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. तसेच राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आणखी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!