Share

IPL 2022 DC vs LSG : लखनऊची टॉस जिंकून पहिली बॅटिंग; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या ४५व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ (DC vs LSG) आमनेसामने आले आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. याआधी या मोसमात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला, ज्यामध्ये लखनऊने दिल्लीचा ६ विकेट्सने पराभव केला होता.

या सामन्यात लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खान दुखापतीमुळे बाहेर आहे. अष्टपैलू खेळा़डू कृष्णप्पा गौतमला संधी मिळाली आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने मागील सामन्यातील संघ कायम राखला आहे. यंदाच्या हंगामात, दिल्लीने आतापर्यंत ८ सामन्यांमध्ये चार विजय नोंदवले आहेत आणि ते सहाव्या स्थानावर आहे, तर लखनऊने ९ पैकी ६ सामने जिंकले आहेत आणि ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

दोन्ही संघांची Playing 11

दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कप्तान), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया.

लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, मोहसिन खान, रवी बिश्नोई.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!