🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) सलग आठ सामने गमावल्यानंतर, मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला (RR vs MI) हरवत हंगामातील पहिला विजय नोंदवला. यानिमित्ताने रोहितला वाढदिवशी सुंदर गिफ्ट मिळाले. या विजयानंतर रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे.
रोहित या गिफ्टविषयी म्हणाला, ”मी ते नक्कीच स्वीकारेन, आम्ही अशा प्रकारे खेळतो, खरी क्षमता आज समोर आली, विशेषतः गोलंदाजीत. ते सतत दबाव आणत होते. जर तुम्ही विकेट घेत राहिलात तर त्यांच्यासाठी ते कठीण होईल आणि आज आम्ही ते उत्तम प्रकारे केले. गोलंदाजीत काही बदल वगळता आम्ही पहिल्या दोन सामन्यात खेळलो तोच हा संघ आहे.”
Captain RO cha birthday aur pehle jeet ki khushi ???? Aaj ka ???????? ???????????????????? ekdum special hai! ????????#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/0WdV6yaiD7
— Mumbai Indians (@mipaltan) May 1, 2022
रोहित पुढे म्हणाला, ”जेव्हा तुमच्याकडे असा हंगाम असतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या संयोजनाची खात्री नसते. तुम्हाला खूप काही करून बघायचे असते. आम्ही सर्वोत्तम संयोजन करण्याचा प्रयत्न करतो. आठ सामन्यांमध्ये ते चालले नाही. आम्ही यापूर्वीचा एक सामना जिंकला असता तर परिस्थिती थोडी वेगळी असती. आम्ही खूप चांगले खेळलो.”
असा रंगला सामना…
पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सलग आठ पराभवानंतर पहिला विजय मिळाला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (RR vs MI) सामन्यात मुंबईने ५ गडी राखून विजय नोंदवला. कप्तान आणि ‘बर्थडे बॉय’ रोहित शर्माला या विजयाच्या रुपात खास गिफ्ट मिळाले. या सामन्यात रोहितने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोस बटलरच्या संयमी अर्धशतकमुळे राजस्थानला २० षटकात ६ बाद १५८ धावा करता आल्या. शेवटच्या दोन षटकात राजस्थान संघाला मोठी फटकेबाजी करता आली नाही. प्रत्युत्तरात सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने १९.२ षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
