🕒 1 min read
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २७ एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलवरील कराच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यानेच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोरोना सोडून इतर विषयांवर पंतप्रधानांनी तारा छेडल्या, तसेच मोदींकडून महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याचेही त्यांनी म्हटले. यावरच भाजपचे मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
“खा. राऊतांना आपण खरंच सर्वज्ञानी आहोत, हे वाटायला लागलंय की काय? अकलेचा आणि तुमचा काडीचा तरी संबंध आहे का? आले चॅनलचे बूम आणि ठोकली काहीही ‘धूम’”, असे ट्वीट करत मुरलीधर मोहोळ यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
खा. राऊतांना आपण खरंच सर्वज्ञानी आहोत, हे वाटायला लागलंय की काय?
अकलेचा आणि तुमचा काडीचा तरी संबंध आहे का?
आले चॅनलचे बूम आणि ठोकली काहीही ‘धूम’@Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra pic.twitter.com/Kbd3QnBxv8
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 29, 2022
ज्या ठिकाणी तुमचं सरकार नाही त्या मुख्यमंत्र्यांबाबत तुम्ही द्वेषपूर्ण बोलायला नको. आम्हालाही स्वाभिमान आहे. देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात. ते देशाचे असतात. ज्या राज्यात सरकार नाही, तिथेही संवेदशनशील असायला हवं. पण दुर्दैवाने सावत्रपणाची वागणूक मिळते. त्यांची आर्थिक कोंडी केली जाते. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
महत्वाच्या बातम्या:
- “राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव यशस्वी…” – एकनाथ खडसे
- “योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय”, संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला
- “ज्यांचं संपूर्ण राजकारणच खोटेपणावर अवलंबून…”, ‘त्या’ प्रकरणावरून केशव उपाध्येंचा शरद पवारांना टोला
- “…असे म्हणणे महाराष्ट्राचा अपमान नाही का?”, सचिन सावंत यांचा राज ठाकरेंना सवाल
- “…हे पवार साहेबच करू शकतात”, ‘त्या’ प्रकरणावरून निलेश राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
