🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सनरायझर्स हैदराबादला गुजरात टायटन्सविरुद्ध (GT vs SRH) पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आपल्या कामगिरीने सर्व चाहत्यांची मने जिंकली. त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये २५ धावा देऊन पाच बळी घेतले. वृद्धिमान साहा (६८), शुबमन गिल (२१), कर्णधार हार्दिक पंड्या (१०), डेव्हिड मिलर (१७) आणि अभिनव मनोहर (०) यांना उमरानने बाद केले.
उमरानचे चाहते सोशल मीडियावर या गोलंदाजाचे खूप कौतुक करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्यानंतर आता पी. चिदम्बरममही चाहत्यांच्या यादीत सामील झाले आहेत. चिदम्बरम यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल ट्विटरवर पोस्ट करून उमरानचे कौतुक केले. ”उमरान मलिक नावाचे वादळ त्याच्यासमोर येणारे सर्व काही नष्ट करत आहे”, असे चिदम्बरम म्हणाले.
चिदंबरम यांनी लिहिले, ”उमरानचा वेग आणि आक्रमकता मंत्रमुग्ध करणारी आहे. गुजरातविरुद्धची त्याची कामगिरी पाहिल्यानंतर तो या मोसमातील सर्वात मोठा शोध आहे यात शंका नाही. बीसीसीआयने उमरानसाठी विशेष प्रशिक्षकाची नियुक्ती करावी आणि त्याला भारतीय संघात स्थान द्यावे.”
The Umran Malik hurricane is blowing away everything in its way
The sheer pace and aggression is a sight to behold
After today’s performance there can be no doubt that he is the find of this edition of IPL
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 27, 2022
The BCCI should give him an exclusive coach and quickly induct him into the national team
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 27, 2022
असा रंगला सामना…
वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींना जबरदस्त सामना पाहायला मिळाला. सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये गुजरात टायटन्सकडून (GT vs SRH) ५ गड्यांनी पराभव पत्करला. या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा, एडन मार्कराम यांची अर्धशतके आणि शशांक सिंहच्या स्फोटक खेळीच्या जोरावर हैदराबादने गुजरातसमोर १९५ धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात गुजरातचे पहिले पाच फलंदाज हैदराबादच्या एकट्या उमरान मलिकसमोर ढेपाळले. त्यानंतर राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनी स्फोटक खेळी करत हैदराबादच्या आव्हानाचा शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून पाठलाग केला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
