🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील कोलकाता नाइट रायडर्स (DC vs KKR) विरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने त्यांची नवीन जर्सी लॉन्च केली आहे. टीमने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या जर्सीचे फोटो शेअर केले आहेत. दिल्ली कॅपिटल्सची ही नवीन जर्सी खूपच रंगीत आहे. जर्सीवर इंद्रधनुष्य सावली आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर जर्सीचे फोटो शेअर केले आहेत ज्यात प्रमुख खेळाडू ही जर्सी परिधान करताना दिसत आहेत.
कर्णधार ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि मुस्तफिजुर रहमान नवीन जर्सीमध्ये दिसत आहेत. “आम्ही आयपीएलच्या दुसऱ्या हाफची सुरुवात रंगीत संदेशाने करत आहोत. कोलकाताविरुद्धच्या आजच्या सामन्यात आमचे खेळाडू ही खास जर्सी घालतील”, असे दिल्लीने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
Kicking off our 2nd half of #IPL2022 on a colourful note ????
Special threads being donned by our DC boys tonight in #DCvKKR ????#YehHaiNayiDilli | #TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/i5kWfBeoWB
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 28, 2022
आयपीएल २०२२मध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना वानखेडे मैदानावर कोलकाता नाइट रायडर्स संघाशी होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत ७ सामन्यांत फक्त तीन विजय नोंदवले आहेत आणि ते सातव्या स्थानावर आहेत. संघाला प्लेऑफच्या शर्यतीत टिकायचे असेल तर हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या मोसमात एकदा दिल्ली कॅपिटल्स संघाने केकेआरला पराभूत केले आहे, अशा परिस्थितीत त्यांचे मनोबल उंचावलेले असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
