🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या ४१व्या सामन्यात दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (DC vs KKR) आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधला हा सामना आज संध्याकाळी साडेसातपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या १५व्या मोसमात, दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत ७ सामन्यांत केवळ तीन विजय नोंदवले आहेत आणि ते सातव्या स्थानावर आहेत, तर कोलकाता नाइट रायडर्सने ८ पैकी केवळ ३ सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत ते आठव्या स्थानावर आहेत.
पहिल्या काही सामन्यांनंतर दोन्ही संघांची कामगिरी खराब झाली आहे. अशा स्थितीत कोलकाता आणि दिल्लीला आजचा सामना जिंकायचा आहे. आयपीएलमध्ये दोन्ही संघ ३० वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान दिल्लीने १३ सामने जिंकले आहेत, तर केकेआरने १६ सामने जिंकले आहेत.
गेल्या मोसमात दोन्ही संघ तीनदा आमनेसामने आले. यादरम्यान केकेआरने दोनदा, तर दिल्लीने एक सामना जिंकला. त्याच वेळी, या हंगामात एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने केकेआरचा पराभव केला आहे. नितीश राणाने केकेआरकडून दिल्लीविरुद्ध सर्वाधिक ३२० धावा केल्या आहेत.
Dilli waalo, kal phir milenge ????????@DelhiCapitals #KKRHaiTaiyaar #DCvKKR #IPL2022 pic.twitter.com/KMOb9UD94K
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 27, 2022
केकेआर विरुद्ध दिल्लीच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉने सर्वाधिक ३९२ धावा केल्या आहेत. सुनील नरिनने आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध केकेआरकडून सर्वाधिक २१ विकेट्स घेतल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्ससाठी केकेआरविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कुलदीप यादवने ४ विकेट घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
