Share

IPL 2022 : आधीच ८ पराभव आणि त्यात…! मुंबई इंडियन्सला बसला अजून एक धक्का; वाचा घडलंय काय?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला आठ पराभवासोबत अजून एक मोठा धक्का बसला आहे. संघात समाविष्ट केलेला डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद अर्शद खान दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अर्शदच्या जागी कुमार कार्तिकेय सिंगची निवड करण्यात आली असून तो आगामी सामन्यांमध्ये मुंबई संघात सामील होईल.

मध्य प्रदेशच्या अर्शद खानला आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांना विकत घेतले पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही आणि तो स्पर्धेबाहेर पडला. अर्शदच्या जागी आलेला कार्तिकेय सिंग हा डावखुरा फिरकीपटू आहे आणि मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेटही खेळतो. मुंबईने या खेळाडूचा २० लाखांच्या रकमेत समावेश केला आहे.

कुमार कार्तिकेय सिंगने आतापर्यंत ९ प्रथम श्रेणी सामने, १९ लिस्ट ए सामने आणि ८ टी-२० सामने खेळले असून, त्याने अनुक्रमे ३५, १८ आणि ९ विकेट घेतल्या आहेत. पाच वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी हा मोसम दुःस्वप्नसारखा राहिला आहे. त्यांच्या पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर हा ट्रेंड कायम राहिला आणि पहिल्या आठ सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत आता उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करताना विश्वासार्हता वाचविण्याचे आव्हान संघासमोर असेल.

आयपीएल २०२२साठी मुंबई इंडियन्सचा संघ

रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, अनमोलप्रीत सिंग, कुमार कार्तिकेय सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, बेसिल थम्पी, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, अर्जुन मिल्स, अर्जुन मिल्स. तेंडुलकर, डॅनियल सॅम्स, डेव्हॉल्ड ब्रेविस, हृतिक शोकिन, संजय यादव, टीम डेव्हिड, इशान किशन, फॅबियन अॅलन, आर्यन जुयाल.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!