Share

“…हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही”, अजित पवार यांचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२८ एप्रिल) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राज्यातील चालू घडामोडींवर भाष्य केले. तसेच आपण ज्यांना पुरस्कृत करतो, ते आपल्यासोबतच राहतील का? हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही, असेही अजित पवार म्हणाले.

यावेळी बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,‘नवनीत राणा या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांचे पती रवी राणा हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होते. २०१९ ला पुन्हा रवी राणा आणि नवनीत राणा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार होते. आपण ज्यांना पुरस्कृत करतो, ते आपल्यासोबतच राहतील का? हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सरकार येईल असे कुणालाच वाटले नव्हते. एके काळी ममता बॅनर्जी आणि भाजप एकत्र होते, आज ममतादीदी भाजपच्या विरोधक आहेत.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘बिहारमध्ये नितीश कुमार कधी भाजप सोबत असतात कधी भाजपचे विरोधक होतात. त्यामुळे अशा घटना आपल्या इथेच नाही, तर भारतभर घडत असतात,’ अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!