🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात भोंग्याच्या वादावर तोडगा निघावा आणि भोंग्याच्या मुद्द्यावर एक सर्वसमावेशक धोरण असावं यासाठी राज्य सरकारच्या वतीने एक सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) गैरहजर राहिले. दरम्यान, यामागचे कारण फडणवीसांनी आज (२५ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भ्रष्टाचाराच्या विरोधातील आमची लढाई सुरूच राहील. तसेच महाराष्ट्रात अशी परिस्थिती आम्ही कधीच बघितली नाही की सरकार पक्षाचे लोक, पोलीस संरक्षणात विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून जीवे मारण्याकरता हल्ला करत आहेत.”
दरम्यान, आम्ही पोलखोल यात्रा काढली, या यात्रेच्या माध्यामातून मुंबई महापालिकेतील सगळा भ्रष्टाचार हा आम्ही जनतेसमोर मांडला. लोकशाहीत यापेक्षा वेगळं काय करायचं असतं? पण ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांनी आमच्या पोलखोल सभांवर हल्ला केला. त्यांना वाटत आहे की अशाप्रकारचे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं बंद करू, पण हा त्यांचा गैरसमज आहे, असेही फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- भोंग्याचा वाद! सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरेंनंतर फडणवीसांनी फिरवली पाठ
- “अबकी बार GST की मार, लेकर आयी…”, नाना पटोलेंचा हल्लाबोल
- “अप्रतिष्ठित माणसाला आमंत्रण देऊन..”, ‘त्या’ घटनेवरून निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- अंजली दमानिया शिवसेनेवर संतापल्या; म्हणाल्या, “बाई या शब्दाचा…”
- “नवनीत राणा यांना वॉशरूमला जाण्याची परवानगी दिली नाही”, देवेंद्र फडणवीसांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
