Share

“…मध्ये अचानक आलेली विषमता अस्वस्थ करणारी”, प्रीतम मुंडेंचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

Published On: 

🕒 1 min read

बीड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत मोठे वक्तव्य करत त्यासमोर हनुमान चालीसा लावणार असे म्हटले होते. त्यानंतर उत्तर सभा घेत त्यांनी राज्य सरकारला भोंगे उतरविण्यासंदर्भात ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच आता भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

धर्मा-धर्मामध्ये दुही निर्माण होतेय हे निश्चितच निराशाजनक आहे. कोणाविषयी बोलण्याचं कारण नाही, पण आपल्या समाजात अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी कधी ना कधी राजकीय नेत्यांना या विषयाला सामोरे जावं लागणार आहे. असे म्हणत प्रीतम मुंडे यांनी अप्रत्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.  त्या बीडमध्ये बोलत होत्या.

दरम्यान यावेळी त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेही कौतुक केले आहे. कोरोना काळात सरकारने चांगले काम केले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मी कौतुक करते. राजकीय मंचावर येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय वेगळे  मात्र आरोग्य हा असा विषय आहे की, त्यामध्ये कोरोनाचा सामना करत असताना केंद्र सरकार ज्याप्रकारे सजग आणि सतर्क होते त्याप्रमाणे राज्य सरकारने सतर्क राहून कार्य केले. असे प्रीतम मुंडे यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!