🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२मध्ये आज पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे. नाणेफेक गमावलेल्या केएल राहुलच्या लखनऊने दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईला २० षटकात २०० धावांचे आव्हान दिले आहे. राहुलने विक्रमी शतक ठोकले. ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजी विभागात पुन्हा गफलत पाहायला मिळाली, शिवाय क्षेत्ररक्षणही सुमार दर्जाचे राहिले.
लखनऊचा डाव
कप्तान केएल राहुल आणि क्विंटन डी कॉ़क यांनी लखनऊसाठी अर्धशतकी सलामी दिली. फिरकीपटू फॅबियन एलनने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्याने डी कॉकला (२४) पायचीत पकडले. त्यानंतर आलेल्या मनीष पांडेनेही (३८) राहुलसोबत अर्धशतकी भागीदारी उभारली. चांगल्या लयीत खेळणाऱ्या राहुलने १२व्या षटकात आपले अर्धशतक फलकावर लावले. मुरुगन अश्विनने मनीषची दांडी गुल केल्यानंतर मार्कस स्टॉइनिसही (१०) लवकत तंबूत परतला. १९व्या षटकात राहुलने टायमल मिल्सला चौकार ठोकत आपले शतक साजरे केले. १००व्या आयपीएल सामन्यात शतक ठोकणारा केएल राहुल पहिला फलंदाज ठरला. २० षटकात लखनऊने ४ बाद १९९ धावा केल्या. राहुलने ६० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद १०३ धावा केल्या.
KL Rahul notched up his third IPL century ????
A special innings from KL Rahul guided LSG to a big total in the game against MI ????#KLrahul #LSG #MIvsLSG #IPL2022 #Cricket pic.twitter.com/K5uvNJqOQ7
— Wisden India (@WisdenIndia) April 16, 2022
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, फॅबियन एलन, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स.
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, दुष्मंथा चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
