Share

“समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारतां” – चित्रा वाघ संतापल्या

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनिमित्त भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ या काल प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये गेल्या होत्या. प्रचारात बोलताना, सभेत दगड मारण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी ट्विट करत केला आहे.

“वाह रे बहाद्दरांनो…, समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारतां”, भाजपा उत्तर कोल्हापूर उमेदवार सत्यजीत कदम यांच्या प्रचारार्थ सभेत काल संध्याकाळी मी बोलत असताना तिथे दगडं मारण्यात आली असल्याचा दावा थेट चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन केला आहे. तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांवर दाखवा. असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही हे लक्षातचं ठेवा, असा थेट इशारा चित्रा वाघ यांनी केला आहे.

भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी काल कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी कोल्हापुरातील प्रचारादरम्यान सायंकाळी चित्रा वाघ यांच्या प्रचारसभेत दगड फेक करण्यात आली. चित्रा वाघ यांच्या प्रचार सभेत दगड फेक झाल्यानंतर त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

महत्वाच्या बातम्या –

मनसे नेत्याने ‘अजान’च्या निषेधार्थ लाऊडस्पीकरवर वाजवली ‘हनुमान चालिसा’, मुंबई पोलिसांनी ठोठावला दंड
प्रभाकर साईलमुळे समीर वानखेडेंचा मुखवटाच फाटला- संजय राऊत
“त्यांनी हनुमान चालिसा जरुर लावावी पण…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
प्रभाकरच्या सत्य कथनाने कित्येक आर्यन खान बळी जाण्यापासून वाचले- संजय राऊत
मोदी यांनी पंतप्रधान म्हणून प्रभाकरच्या मृत्यूकडे गांभीर्याने पाहायला हवे; संजय राऊतांची मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!