Share

IPL 2022: पंजाबचा विस्फोटक फलंदाज ओडियन स्मिथ आहे हिटमॅनचा फॅन; म्हणाला “मला त्याच्यासारखं खेळायचंय…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : यंदाच्या आयपीएल सीजन मध्ये पंजाब किंग्जला ओडियन स्मिथच्या रूपाने एक स्फोटक फलंदाज मिळाला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने आरसीबीविरुद्ध ८ चेंडूत २५ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे हा ओडियन स्मिथचा पहिलाच आयपीएल हंगाम आहे. त्याने पदार्पणाच्या सामन्यात ज्या प्रकारे विध्वंसक खेळी खेळली, त्यामुळे त्याचे खूप कौतुक झाले. मात्र वेस्ट इंडिजचा हा हार्ड हिटिंग खेळाडू हिटमॅन रोहित शर्माचा मोठा चाहता आहे.

ओडियन स्मिथने (odean smith) खुलासा केला आहे की तो टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार रोहित शर्माचा (rohit sharma) मोठा फॅन आहे. तसेच तो हिटमॅनला भेटायला उत्सुक आहे. रोहितला पसंती देण्याचे कारण स्पष्ट करताना, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू म्हणाला की त्याला हिटमॅनचा आक्रमक फलंदाजीचा स्वभाव आत्मसात करायला आवडेल. तो म्हणाला, ” मला रोहित शर्मा खूप आवडतो. तो अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याचा स्वभाव खूप आक्रमक आहे, मला माझ्या खेळातही अशी आक्रमकता आणायची आहे, मला त्याला बघायला आवडते.”

ओडियन स्मिथ पुढे म्हणाला की, रोहितशी माझे अद्याप बोलणे झालेले नाही, पण आशा आहे की मी लवकरच त्याच्याशी बोलेन.” पंजाब किंग्ज (PBKS) आणि मुंबई इंडियन्सचा अजूनही आयपीएल मध्ये सामना झालेला नाहीये. १३ एप्रिल रोजी हे दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहे. त्यावेळी ओडीयन स्मिथ रोहित शर्माला भेटू शकतो. तेव्हा दोन्ही हार्ड हीटिंग खेळाडू एकमेकांच्या समोर असतील.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!