🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२चा ११वा सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल. या आयपीएल हंगामात दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना गमावला आहे आणि अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे.
आयपीएलच्या १५व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवांना सामोरे जावे लागले होते. त्याचवेळी पहिल्या सामन्यात आरसीबीचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जला केकेआरविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाब किंग्जसाठी गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. संघाचे गोलंदाज त्या चांगल्या लयीत दिसत नाहीत. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जचा संघ एकसंध कामगिरी करू शकलेला नाही.
हेड-टू-हेड आकडेवारीत चेन्नई सुपर किंग्जचा वरचष्मा आहे. चेन्नईने १५ सामने जिंकले असून पंजाबने १० सामने जिंकले आहेत. मागील हंगामात दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध विजय मिळवला होता. आधी चेन्नईने पंजाबचा पराभव केला आणि नंतर पंजाबने विजय मिळवला. सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्जकडून पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने एकूण ७१३ धावा केल्या आहेत. या आयपीएल हंगामात तो संघाचा भाग नाही.
केएल राहुलने पंजाब किंग्जकडून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वाधिक ३६५ धावा केल्या आहेत, परंतु आता तो पंजाब किंग्ज संघाचा भाग नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
- “ईडी भाजपची घरगडी आहे का”? – चंद्रकांत पाटलांना नाना पटोलेंचं प्रत्युत्तर
- IPL 2022 CSK vs PBKS : मागचा रेकॉर्ड काढला तर आज ‘हा’ संघ मारणार बाजी!
- शाहरुख,सलमान,अक्षय,आणि सैफने सौदी अरबच्या मंत्र्यांची घेतली भेट; पहा काय आहे कारण?
- “उफ्फ! हृतिक रोशनचा ‘वेधा’ लुक पाहून गर्लफ्रेंड सबा म्हणाली…
- “मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे लागतील” – राज ठाकरे
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
