Share

“काका धर्माला वाचवा”, सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल (२ एप्रिल) माजी मंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलत असतांना शरद पवारांनी धर्माच्या नावानं देशात अंधकार पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वक्तव्य केले. दरम्यान, पवारांच्या या वक्तव्यावर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व आमदार सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘काका धर्माला वाचवा! जेव्हा आपला धर्म शेतकरी हिताचा आहे हे आपण विसरलात आणि नवाब मलिक ह्यांची पाठराखण केली तेव्हा जनतेला आपली जात, धर्म सगळं कळलं. ती म्हणजे राष्ट्रद्रोही राजकारणी’, असे खोत म्हणाले.

दरम्यान, ‘कोणी व्यवसाय चांगला करत असेल तर तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी व्यवसाय करु शकतो. पण हा अमुक एका धर्माचा म्हणून त्याच्याकडून माल घ्यायचा नाही अशी भूमिका देश पुढे घेऊन कसा जाईल?’, असा सवालही यावेळी बोलत असतांना शरद पवारांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!