Share

IPL 2022 MI vs RR : राजस्थानचा मुंबईवर हल्लाबोल; नोंदवला सलग दुसरा विजय!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२२मध्ये सलग आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात राजस्थानने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला २३ धावांनी धूळ चारली. सलामीवीर फलंदाज जोस बटलरची शतकी खेळी आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या कामगिरीच्या जोरावर राजस्थानने मुंबईसमोर २० षटकात ८ बाद १९३ धावा उभ्या केल्या. मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बटलरने मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढत ६८ चेंडूत १०० धावा ठोकल्या, तर शिमरोन हेटमायरने १४ चेंडूत ३५ धावा ठोकत त्याला उत्तम साथ दिली. प्रत्युत्तरात मुंबईकडून इशान किशन आमि तिलक वर्मा यांनी अर्धशतके ठोकली, पण मोक्याच्या क्षणी मुंबईचे फलंदाज ढेपाळले आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

मुंबईचा डाव

मुंबईचा कप्तान रोहित शर्मा (१०) संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकला नाही. राजस्थानचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने त्याला रियान परागकरवी झेलबाद केले. त्यानंतर मुंबईला अनमोलप्रिस सिंगच्या रुपात धक्का बसला. दोन फलंदाज लवकर गमावल्यानंतर सलामीवीर इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी भागीदारी रचली. इशांननेन ५ चौकार आणि एका षटकारासह ५४ तर तिलकने ३ चौकार आणि ५ षटकारांसह ६१ धावा केल्या. मुंबई सहज विजय मिळवेल, असे वाटत असताना मुंबईच्या विकेट पडल्या. एका बाजूने कायरन पोलार्डने झुंज दिली, पण राजस्थानच्या नवदीप सैनी, यजुर्वेंद्र चहल यांनी अचूक टप्प्यावर मारा केला. मुंबईचा संघ २० षटकात ८ बाद १७० धावांपर्यंतच पोहोचू शकला. सैनी आणि चहल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

राजस्थान रॉयल्सचा डाव

जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. जयस्वाल (१) या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. जसप्रीत बुमराहने त्याला टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. देवदत्त पडिक्कल (७) टायमल मिल्सचा बळी ठरला. त्यानंतर कप्तान संजू सॅमसनने १ चौकार आणि ३ षटकारांसह वादळी ३० धावा केल्या. कायरन पोलार्डने सॅमसनचा अडथळा दूर केल्यानंतर मैदानात आला शिमरोन हेटमायर. त्याने पोलार्डच्या एका षटकात २६ धावा लुटल्या. दरम्यान एका बाजूने फटकेबाजी करणाऱ्या बटलरने आपले दुसरे आयपीएल शतक फलकावर लावले. १९व्या षटकात बुमराहने हेटमायर आणि बटलरला माघारी धाडले. त्यामुळे राजस्थानला दोनशेपार जाता आले नाही. हेटमायरने १४ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांस ३५ तर बटलरने ११ चौकार आणि ५ षटकारांसह १०० धावा केल्या. राजस्थानने २० षटकात ८ बाद १९३ धावा केल्या. शेवटच्या २ षटकात राजस्थानने ५ फलंदाजांना गमावत फक्त ११ धावा काढल्या. बुमराहने १७ धावांत ३ तर टायमल मिल्सने ३५ धावांत ३ बळी टिपले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!