🕒 1 min read
मुंबई: आयपीएल २०२२मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन बलाढ्य संघ आज आमनेसामने आले आहेत. आज रंगणाऱ्या या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थानने शानदार सुरुवात केली आहे. ज्यात सलामीवीर जॉस बटलरने अप्रतिम अर्धशतक झळकवले आहे.
सलामीला आलेल्या जॉसने (jos buttler) सुरुवातीपासूनच आक्रमकपणे खेळणे सुरु केले. यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतरही त्याने खेळ बदलला नाही. दरम्यान मुंबईकडून तिसरी ओव्हर टाकायला आलेल्या बसिल थंपीच्या (basil thampi) ओव्हरमध्ये त्याने धुव्वा उडवला. त्याने दोन चौकार आणि ४ षटकार लगावत तब्ब्ल २६ धावा काढल्या. तसेच यावेळी तो १९० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत होता. त्याने यात १०१ मीटरचा लांब षटकारही लगावला. बसिलची ती ओव्हर आयपीएल २०२२ ची सर्वात महागडी ओव्हर ठरली.
या सामन्यात जॉस बटलरने केवळ ३२ चेंडूत अर्धशतक ठोकले. आयपीएल मधील हे त्याचे १२ वे अर्धशतक होते. एकेकाळी मुंबईकडून खेळलेल्या बटलरने आज मुंबईलाच धुवून काढले आहे. आता पर्यंतच्या खेळात त्याने ८ चौकार आणि ५ षटकार लगावले आहे. जॉसचा खेळ बघत तो शतकही करू शकतो अशी संभावना दिसत आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याची अर्थव्यवस्था १ कोटी ट्रिलीयन डॉलरपर्यंत वाढवण्याचं उद्दीष्टं – अजित पवार
- प्रसिद्ध यूट्यूबर ‘भुवन बाम’वर वादग्रस्त व्यक्तव्यामुळे FRI दाखल
- महाराष्ट्र राज्याचे चित्र बदलण्यासाठी राज्य सरकार सदैव प्रयत्नशील आहे- शरद पवार
- “मराठीचा आग्रह धरायचा असेल तर…”- अजित पवार
- “…मग काँग्रेस भाजपची बी टीम नाही का?”, प्रकाश आंबेडकरांचा मविआ सरकारला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
