Share

महाराष्ट्र राज्याचे चित्र बदलण्यासाठी राज्य सरकार सदैव प्रयत्नशील आहे- शरद पवार

Published On: 

🕒 1 min read

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज (२ एप्रिल) माजी मंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला केला. तसेच महाराष्ट्र राज्याचे चित्र बदलण्यासाठी राज्य सरकार सदैव प्रयत्नशील आहे, असेही पवार म्हणाले.

यावेळी बोलत असतांना शरद पवार म्हणाले की, ‘शिवाजीराव नाईक हे एक यशस्वी जिल्हा परिषद अध्यक्ष होते. त्यांच्या त्या यशस्वी कारकीर्दीमुळेच त्यांना देशपातळीच्या राजकारणात पाठवायचा निकाल त्यावेळच्या राज्य सरकारने केला. सहकार, पंचायत राज, शैक्षणिक, कृषी व औद्योगिक क्षेत्रांत त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आज ते स्वगृही परत येत आहेत. मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांचं मनापासून स्वागत करतो. मी जयंतरावांना विनंती करतो की आपण एकदा शिवाजीरावांसोबत बैठक घेऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्य कारभारासाठी कसा होईल, यावर चर्चा करू. त्यांच्या अनुभवाचा आपल्याला राज्यपातळीवर नक्कीच फायदा होईल.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘मला आनंद आहे की आपलं राज्य सरकार एकत्रित प्रयत्नांनी महाराष्ट्र राज्याचे चित्र बदलण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. त्याला तुम्ही नेहमीच पाठिंबा द्याल, अशी आशा मी व्यक्त करतो. मानसिंगराव, शिवाजीराव व त्यांचे असंख्य सहकारी यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!