Share

हे काय! प्रीती झिंटाचे नाव ऐकताच संतापलेल्या इरफान पठाणने रैनाला लाइव्ह शो सोडण्याची दिली धमकी ; VIDEO व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मिस्टर आयपीएलच्या नावाने चर्चेत असलेला सुरेश रैना यावेळी अनसोल्ड राहिला. यावेळी तो आयपीएलच्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याऐवजी समालोचक आणि क्रिकेट तज्ञाची भूमिका बजावत आहे. दरम्यान, आता सुरेश रैना आणि इरफान पठाण यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इरफान पठाण मिस्टर आयपीएलच्या बोलण्याने खूपच निराश दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये रैनाच्या बोलण्याने इरफान दुखावलेला दिसत आहे. पण, जे घडते ते पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःला हसण्यापासून रोखू शकणार नाही. ही १ एप्रिलची गोष्ट आहे जेव्हा सुरेश रैना (Suresh raina) आणि इरफान (irfan pathan) कार्यक्रमात तज्ञ म्हणून बोलत होते. दरम्यान, इरफान पठाणने सुरेश रैनाला एप्रिल फूल बनवण्याची योजना आखली आणि संभाषणादरम्यान रैनाच्या चर्चेत प्रीती झिंटाचे (preity zinta) नाव ऐकून त्याच्यावर नाराज असल्याचे नाटक रचले. एवढेच नाही तर लाइव्ह शो तत्काळ सोडण्याची धमकीही दिली. त्याचवेळी प्लॅनिंगबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या सुरेश रैनाने त्याची समजूत घातली आणि कसा तरी त्याला परत बोलावले. आता दोघांचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचे कारण बनला आहे.

पंजाब किंग्ज आणि केकेआर यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात इरफान पठाण त्याच्या आवडत्या संघ पंजाब किंग्जचे कौतुक करताना या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः पाहू शकता. अशा परिस्थितीत रैनानेही त्याचे म्हणणे मान्य केले आणि पंजाब किंग्जची सहमालक प्रीती झिंटाचे नाव घेतले. यानंतर जे नाट्य घडते, ते व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळते आहे. इरफानने रैनाला यावेळी ‘एप्रिल फुल’ केल्याचे नंतर त्याला समजले.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!