🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मागील वर्षी भाजपने आयोजित केलेल्या जन आशिर्वाद यात्रा दरम्यान नारायण राणे यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर भाष्य करताना राणे यांनी, “मी असतो तर त्यांच्या कानशिलात वाजवली असती” असे विधान केले होते.
राणेंच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. अनेक ठिकाणी शिवसैनिक आक्रमक झाले होते. या विधानानंतर पुणे, नाशिक, महाड, धुळे व राज्यातील विविध ठिकाणी राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
धुळे जिल्हयात दाखल असलेल्या गुन्ह्यात फौजदारी कायद्याअंतर्गत राणेंना १० मार्च रोजी नोटीस बजावण्यात आली होती. गुन्हा दाखल रद्द करण्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर १७ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
“सगळ्यांनीच मन मोठं करून जगायला शिकलं पाहिजे”- विजय वडेट्टीवार
IPL 2022: आंद्रे रसेलच्या पॉवर हिटिंगचा ‘किंग खान’ही झाला फॅन; ट्वीट करत म्हणाला….
“नागरिकांनी मास्क घालणं टाळू नये”- विजय वडेट्टीवार
IPL 2022 : जडेजाच्या CSKचं टेन्शन दूर होईना..! एक खेळाडू रुग्णालयात, तर दुसरा…
“शेतकऱ्यांचा आक्रोश तुमच्या बंद कानावर पडतो का पवार साहेब?”, सदाभाऊंचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
