Share

“…त्यामुळे काहीजण सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारतात”, मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज (२ एप्रिल) जीएसटी भवनाच्या इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच काहीजण सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारत आहेत, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,‘आजचे भूमीपूजन हे फक्त नारळ फोडण्यासाठी नसून आजपासून प्रत्यक्ष काम सुरू करत आहोत. तसेच हे आपल्या कामाचे एक उदाहरण आहे जे सगळ्यांसमोर ठेवतोय. ते पाहिल्यानंतर आपल्यावरती रुसवा, फुगवा किंवा आपल्यामध्ये कटुता निर्माण व्हावी अशा काहीजण मनाच्या गुढ्या उभारतात. कारण त्यांना दुसरा उद्योग नाही, ते कामाच्या गुढ्या उभारू शकत नाहीत. मग सरकार पाडण्याच्या गुढ्या ते मनातल्या मनात उभारत असतात’, असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार राहूल शेवाळे, विधान परिषद सदस्य आर. तमिल सेलवन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!