Share

“शरद पवार भीष्म पितामह तर देवेंद्र फडणवीस अर्जुन”, राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मोहित कंबोज यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २९ मार्च रोजी दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित होते. या बैठकीत शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) अध्यक्षपद भूषवावे यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो संमतही करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार हे सर्व विरोधी पक्षांचे आधारस्तंभ आहेत, भीष्म पितामह आहेत, असे वक्तव्य केले. दरम्यान, संजय राऊतांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात मोहित कंबोज यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘संजय राऊत म्हणाले शरद पवार हे भीष्म पितामह आहेत. मी म्हणतो देवेंद्र फडणवीस अर्जुन आहेत. राऊत साहेब, बाकीचे महाभारत अभ्यासा, आता बोलू नका आजचे कौरव आणि पांडव कोण?’, असे कंबोज म्हणाले आहेत.

दरम्यान, ‘काँग्रेसचे अध्यक्षपद आणि युपीएचे अध्यक्षपद या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तसेच काँग्रेस याबाबतीत पुढाकार घ्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. युपीए कुणाची खासगी जहागीर नाही. आता यूपीए आहे की नाही ही शंका आहे. जर २०२४ ची तयारी करायची असेल तर यूपीए मजबूत करावी लागेल. शरद पवार यामध्ये आघाडीवर आहेत. ते सर्व विरोधी पक्षांचे आधारस्तंभ आहेत, भीष्म पितामह आहेत. पण काँग्रेसकडून मला काही प्रयत्न झालेले दिसत नाहीत. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने अधिक जबाबदारीने पुढे येऊन युपीएच्या जिर्णौद्धाराचे प्रयत्न करायला हवेत’, असे संजय राऊत काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असतांना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!