Share

“जनतेच्या पाकीटमारांचा तपास पूर्ण झाला की…”, ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ईडीच्या या कारवाईवरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी प्रतिक्रिया देत आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज असल्याचे म्हटले. यावरच आता भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh ) यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.

“सर्वज्ञानी जी…जनतेच्या पाकीटमारांचा तपास पूर्ण झाला की तुम्ही म्हणता तसे ED, CBI रेल्वे पाकीटमारांचा तपास सुरू करू शकतात.”, असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी ट्वीट करत लगावला आहे. दरम्यान सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे काही अपराध असतील ,जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले असतील किंवा जमीन लुटली असेल, बळकावली असेल, त्यांनी कुणाला धमकी दिली असेल तर राज्याचे पोलीस तपास करतील. ईडीने खास येऊन तपास करावा आणि धाडी घालाव्यात असा हा गुन्हा नाही. कोणत्याही राज्याचे पोलीस अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करतात. हा राज्यांतील पोलिसांवर सरळ सरळ अतिक्रमण आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ज्या प्रकारे काश्मीरमध्ये अचानक अतिरेकी घुसतात. बॉम्ब हल्ले करतात आणि निघून जातात. त्याच प्रकारे या केंद्राच्या अतिरेकी कारवाया होत आहेत. ईडीला राज्यात घुसवलं जातं आणि ते अटक करून निघून जातात. यातून संघर्ष निर्माण झाला तर केंद्र आणि राज्य हा संघर्ष फार मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. म्हणून ममता बॅनर्जी यांनी गैरभाजप शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्रं पाठवलं असून त्यांनी हे पत्रं याच भूमिकेतून लिहिलं आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे. असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Pariksha Pe Charcha : “आगामी परीक्षेचा वेळ तुमच्या रुटीनप्रमाणेच…”, मोदींनी दिल्या विद्यार्थ्यांना ‘या’ टिप्स

IPL 2022: रिश्तों के भी रूप बदलते है! सामना संपल्यानंतर दिसला धोनी- गंभीरचा ‘याराना’

आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारीचा तपास ED, CBI कडून व्हायचा बाकी- संजय राऊत

कोरिओग्राफर गणेश आचार्य विरोधात लैंगिक छळप्रकरणी गुन्हा दाखल

April Fool’s Day : कधीपासून साजरा केला जातो ‘एप्रिल फुल डे’? जाणून घ्या सविस्तर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!