🕒 1 min read
मुंबई : मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. सूर्यकुमार तंदुरुस्त असून पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई संघासाठी ही आनंदाची बातमी आहे. मुंबई इंडियन्सने याला दुजोरा दिला आहे. सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात दिल्लीविरुद्ध खेळू शकला नव्हता.
मुंबई इंडियन्सने सांगितले, की सूर्यकुमार यादवचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. मुंबईने सूर्यकुमारचा फोटोही ट्विटरवर पोस्ट केला आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सकडून चार विकेट्सने पराभव झाला होता. दिल्लीने केवळ १८.२ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला.
मुंबईला १७८ धावांचे आव्हान राखता आले नाही. दिल्लीचे फलंदाज अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी सातव्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे मुंबई संघाला दणक्यात मोहीम सुरू करता आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022: CSKला टक्कर देण्यास LSG तय्यार..! नाणेफेक जिंकत राहुलचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
- सण साजरे करत असताना कोणतेही निर्बंध लागू नाहित – जितेंद्र आव्हाड
- चेहऱ्यावर रक्ताचे डाग! सनी लिओनीचा लूक पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का
- मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मेट्रोचा दौरा
- शेतकऱ्याने शेती संरक्षणासाठी चक्क अस्वल ठेवलं नोकरीवर; महिना १५ हजार रुपये
PL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
