🕒 1 min read
मुंबई: पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सला शनिवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या हंगामातील दुसर्या सामन्यापूर्वी मोठी बातमी मिळाली आहे. ती म्हणजे संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव NCA मध्ये दुखापतीतून बरा झाल्यानंतर संघात सामील झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान सूर्यकुमारचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता आणि परिणामी श्रीलंका मालिका तसेच दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना खेळण्यास तो मुकला होता.
मुंबई इंडियन्सने (MI) एक निवेदन देत सांगितले, “पॉल चॅपमनच्या सावध नजरेखाली काल संघाने ताकद आणि कंडिशनिंग सत्र पार पाडले. या सत्रात वजन आणि तंदुरुस्ती प्रशिक्षणाचा समावेश होता, ज्यात मुख्य तंदुरुस्तीवर काम करणे आणि सामर्थ्य वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले गेले. सूर्यकुमार यादव त्याच्या अनिवार्य क्वारंटाईनमधून बाहेर पडला आणि त्याचे साथीदार किरॉन पोलार्ड, इशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांच्या कंपनीत जिम सत्रासाठी संघात सामील झाला आहे, ”
सोबतच मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावरही सूर्याच्या (Suryakumar yadav) आगमनाची पोस्ट टाकली गेलीये. जिथे त्यांनी ‘सूर्योदय झाला’ असे कॅप्शन देत त्याचे स्वागत केले आहे. सूर्याचे संघात परतणे मुंबईच्या बॅटिंग लाईनअपला आणखी प्रभावी बनवणार आहे. तसेच त्यांचे लक्ष्य आता स्पर्धेत पहिला विजय मिळवण्याकडे असेल.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाची नियमावली आणखी शिथिल होणार; उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- माझी बदनामी करू नको; संजय दत्त यशला असं का म्हणाला?
- “…या प्रवृत्तीमुळे जनता तुम्हाला चपलेकडे देखील उभी करत नाही”, चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंना टोला
- IPL 2022: शेल्डन जॅक्सनची कॅच बघून रैनाला आठवला गिलक्रिस्ट ; VIDEO व्हायरल
- “सण साजरे नाही करायचे तर मग काय गोट्या खेळायच्या का?- राम कदम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
