🕒 1 min read
मुंबई: आयपीएल २०२२ मधील लीग टप्प्यातील सहावा सामना अतिशय रोमांचक पद्धतीने संपन्न झाला. पुन्हा एकदा या दोन संघांनी इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. नवी मुंबईत खेळल्या गेलेल्या आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यात बंगळुरूने भलेही ३ गडी राखून विजय मिळवला असेल, पण कोलकात्याच्या एका मोठ्या चुकीमुळे हा विजय आरसीबीच्या झोळीत पडला आहे.
झाले असे की , दिनेश कार्तिक (dinesh kartik) आणि हर्षल पटेल (harshal patel) बेंगळुरूच्या (RCB) डावात १८.२ षटकात फलंदाजी करत होते. यावेळी आरसीबीने ७ विकेट गमावल्या होत्या आणि विजयासाठी ११ चेंडूत १६ धावांची गरज होती. या षटकात व्यंकटेश अय्यर(Venkatesh iyer) गोलंदाजी करत होता, यावेळी क्रिजवर असलेल्या कार्तिकने बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एक शॉट खेळला जो थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. यादरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक एक धाव पूर्ण केली. पण स्ट्राईक घेण्याच्या प्रक्रियेत कार्तिकने पुन्हा एकदा किपरच्या शेवटपर्यंत धाव घेतली. हर्षल पटेल त्याच्याकडे न बघता उभा राहिला.
यावेळी दोन्ही फलंदाज एकाच टोकाला उभे होते. मात्र असे असूनही केकेआरचे क्षेत्ररक्षक त्यांना धावबाद करण्यात अपयशी ठरले. कारण यावेळी ना कीपर थ्रो पकडण्यासाठी स्टंपजवळ होता ना केकेआरचा कोणताही खेळाडू बॅकअपसाठी उपस्थित नव्हता. याचा परिणाम असा झाला की कार्तिकने शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या मजेशीर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “मी बाळाला जन्म देण्यासाठी उत्सुक आहे..” समंथा रुथ प्रभू
- राहुल गांधींनी बाईकला हार घालत केला इंधन दरवाढीचा निषेध; दिल्लीत काँग्रेसची निदर्शने
- IPL 2022: कमी धावसंख्या असूनही पराभवानंतर श्रेयसने सांगितले कारण; म्हणाला ‘व्यंकटेशला बॉलिंग…’
- ‘या’ योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार हेक्टरी 50 हजार रुपये!
- “…पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू”, नाना पटोलेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
