🕒 1 min read
मुंबई: राज्यात मविआ नेत्यांवर पडणाऱ्या ईडी धाडी, आरोप-प्रत्यारोप यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) नेहमीच भाजपला टार्गेट करत असतात. त्यातच त्यांनी आज एक नवीन ट्वीट केले आहे. यातून त्यांनी नेमका कुणाला टोला लगावला आहे. याबाबत सध्या चर्चा आहे.
“जब घटीयापन का राज हो तो श्रेष्ठता के स्वप्न देखना राजद्रोह है”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान ईडी कारवाईवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्राच्या बाबतीत किंवा जिथल्या राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री नाहीत. तिथं हा तराजू एका बाजून झुकलेला दिसतो. महाराष्ट्रात विरोधी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून झुंड शाही आणि अराजक निर्माण करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर हा पाळलेल्या गुंडासारखा कोणी करत असेल. तर ते संघराज्य व्यवस्थेला अत्यंत घातक आहे.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
तसेच मी युपीए संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कुणी करावं त्यांचा अतंर्गत प्रश्न आहे. काँग्रेस पक्षानं युपीएसाठी प्रयत्न करावे. तसेच युपीए कुणाची खाजगी जहागीर नाही. सध्या ज्या पध्दतीने महाराष्ट्रात महागाई वाढलेली त्याविरोधात भाजपने रस्त्यावर उतरायला हवं असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“…असल्या भेकड धमक्यांना भाजप भीक घालत नाही”, ‘त्या’ घटनेवरून भातखळकरांचा राष्ट्रवादीला इशारा
“अजित पवार हुशार राजकारणी असून वेळ बरोबर मारून नेतात”, चंद्रकांत पाटलांचा टोला
“The Kashmir Files चित्रपटास करमुक्त करणार नाहीत ते सर्व…”; संजय राऊतांचा भाजपला टोला
‘त्या’ हिंसेवर पाणी टाकण्याऐवजी तेल ओतण्याचे काम भाजपवाले करतायेत; संजय राऊतांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
