🕒 1 min read
मुंबई: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका संपली आहे. यासोबतच आयसीसीने टेस्ट फॉरमॅटची रँकिंग लिस्टही जारी केली आहे. या यादीत जडेजा अश्विन अव्व्ल स्थानी दिसत आहेत तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आयसीसीच्या या क्रमवारीत घसरण झाली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी एका स्थानाने खाली आले असून ते ८ व्या आणि १०व्या स्थानावर आहेत.
भारतीय फलंदाजांच्या क्रमवारीत वरच्या स्थानी असलेला रोहित (rohit sharma) एका स्थानाने खाली घसरून ८ व्या स्थानावर आला आहे. त्याचे ७५४ गुण आहेत, तर ७४२ रेटिंग गुणांसह कोहली (virat kohli) १०व्या स्थानावर आहे. तसेच रवींद्र जडेजाने (ravindra jadeja) अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे, तर रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला सरकवत दुसरे स्थान काबीज केले आहे.
अश्विन आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी गोलंदाजांच्या क्रमवारीत अनुक्रमे दुसरे आणि चौथे स्थान कायम राखले आहे. एकदिवसीय क्रमवारीत कोहली दुसऱ्या स्थानावर स्थिर आहे तर रोहित एक स्थान वर चढून चौथ्या स्थानावर आला आहे. गोलंदाजांमध्ये अव्वल १० मध्ये एकमेव भारतीय असलेला बुमराह सहाव्या स्थानावर कायम आहे.
महत्वाच्या बातम्या
- आदिपुरुष’ मधील प्रभासचा फर्स्ट लूक? रामाच्या भूमिकेत दिसणार ‘बाहुबली’
- “…या नौटंकीला मी काडीची किंमत देत नाही”- प्रवीण दरेकर
- तैमूर आणि इनाया खेमूचे गोंडस क्षण कॅमेऱ्यात कैद, फोटो होतोय व्हायरल
- काँग्रेस शरद पवारांना कधीच यूपीए अध्यक्ष पद देणार नाही – विनायक मेटे
- राजपाल यादवने वर्कआऊटमध्येही लावला कॉमेडीचा तडका! मजेशीर व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
