🕒 1 min read
नवी दिल्ली : साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभास त्याच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आता ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत अंदाज लावला जात आहे की, यावेळी रामनवमीला ‘आदिपुरुष’ चित्रपटाशी संबंधित प्रभासचा फर्स्ट लूक प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ज्यामध्ये प्रभासचे चाहते आणि सर्व सोशल मीडिया यूजर्स ट्विटवर ‘आदिपुरुष’ चित्रपटाशी संबंधित प्रभासचा फर्स्ट लूक रिलीज करण्याबाबत बोलत आहेत. तथापि, चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप कोणताही लूक रिलीज केला नाही. असे असूनही ‘आदिपुरुष’ चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी प्रभासचे चाहते उत्सुक आहेत.
विशेष म्हणजे ‘आदिपुरुष’ हा प्रभासचा बिग बजेट चित्रपट असेल. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याआधी ‘आदिपुरुष’ हा चित्रपट याच वर्षी रिलीज होणार होता, पण आमिर खानचा बहुचर्चित लाल सिंग चड्ढा रिलीज झाल्यामुळे त्याची रिलीज डेट बदलण्यात आली. नुकतीच महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या :
तैमूर आणि इनाया खेमूचे गोंडस क्षण कॅमेऱ्यात कैद, फोटो होतोय व्हायरल
काँग्रेस शरद पवारांना कधीच यूपीए अध्यक्ष पद देणार नाही – विनायक मेटे
राजपाल यादवने वर्कआऊटमध्येही लावला कॉमेडीचा तडका! मजेशीर व्हिडीओ व्हायरल
“पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी वर्दीचा दुरुपयोग केला”- रवी राणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
