Share

उद्योगमंत्री सुभाष देसाईंना औरंगाबाद खंडपीठाचा दणका; नेमके कारण काय?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Industry Minister Subhash Desai) यांना औरंगाबाद खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. विनानिविदा शिवसेना पदाधिकारीला एमआयडीसीतील प्लॉट देण्याचा निर्णयाप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने हा दणका दिला आहे. शिवसेना पदाधिकारी शशिकांत वडळे यांना मंजूर केलेल्या शेंद्रा एमआयडीसीतील प्लॉटचा ताबा घेण्यास औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.डी. धानुका व न्या. एस.जी. मेहरे यांनी मनाई केली आहे. तसेच पुढील सुनावणी ४ एप्रिल रोजी होणार असून या प्रकरणामुळे सुभाष देसाई अडचणीत येण्याची शक्यता आहे.

नेमके प्रकरण काय?

अजित अंबादास मेटे आणि अंबादास विश्वनाथ मेटे हे संचालक असलेल्या एस. एस. वैशाली इंडिया कंपनीला शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र. ए २ मंजूर झालेला आहे. मात्र २०१९ मध्ये कंपनीला आग लागली. तसेच संबंधित कंपनीने प्लॉटचे बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घेतले नसल्यामुळे त्यांना दोन वेळा नोटीस बजावत २०१९ मध्ये एमआयडीसी प्रशासनाने प्लॉट रद्द केला. त्यामुळे मेटे यांनी न्यायालयात आव्हान दिले तर हाच प्लॉट उद्योगमंत्री यांनी शिवसेना पदाधिकारी शशिकांत वडळे यांना मंजूर केला. त्यामुळे वैशाली कंपनीच्या संचालकांनी न्यायालयात याविरोधात दाद मागितली. आता यावर न्यायालयाने शशिकांत वडळे यांना मंजूर केलेल्या शेंद्रा एमआयडीसीतील प्लॉटचा ताबा घेण्यास मनाई केली आहे. मात्र सुभाष देसाई यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान कुठल्याही प्रक्रियेचा अवलंब न करता भूखंड वडळे यांना मंजूर केला त्यामुळे यापूर्वी त्या प्लॉटवर ताबा असलेल्या वैशाली कंपनीच्या मालकांनी न्यायालयात याविरोधात दाद मागितली. आता पुढील सुनावणी होईपर्यंत वैशाली कंपनीचा ताबा काढू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!