🕒 1 min read
मुंबई : विराटने सर्व प्रकारचे कर्णधारपद सोडण्याला बराच काळ लोटला आहे. मात्र आजही अधून मधून त्याच्या नेतृत्वावर चर्चा वक्तव्य येतच असतात. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. रवी शास्त्री यांनी विराट कोहलीच्या आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय योग्य ठरवला आहे. तो आरसीबीसाठी कर्णधार दिसणार नाही, पण तरीही रवी शास्त्रीने विराट कोहलीच्या या निर्णयाचे कौतुक करत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघात माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (ravi shastri) आणि माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) या दोघांची जोडी चांगलीच जमली होती. आयपीएलचा १५वा सीझन सुरू होत आहे. त्याआधी कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याबाबत रवी शास्त्रींचे मोठे वक्तव्य आले आहे. ते म्हणाले की, “मला वाटते कर्णधारपद सोडणे ही एक प्रामाणिक चाल आहे. त्यांच्यासाठी हे वरदान ठरू शकते. कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्या खांद्यावर कोणतेही दडपण नाही. तो मोकळेपणाने खेळू शकतो, मला वाटतं तो खेळायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी त्यांच्या कामगिरीची चिंता करू नये. कारण तो जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे त्याने जागतिक क्रिकेटमधील लोकांना सांगितले आहे. कोहलीने कोणत्याही परिस्थितीत असो, तिथे आनंद घ्यावे.”
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ २७ मार्च रोजी पंजाब किंग्जविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. दोन्ही संघांचे नवे कर्णधार आमनेसामने असतील. आरसीबीसाठी, फॅफ डू प्लेसिस त्याच्या पहिल्या सामन्यात कर्णधारपदासाठी मैदानात उतरेल. दुसरीकडे पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवाल पहिल्या सामन्याची कमान सांभाळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “गरज सरो, वैद्य मरो असं केंद्राचं धोरण”, महागाईवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा
- Women’s WC 2022: WI vs SA सामना रद्द झाल्याने भारताच्या अडचणीत वाढ ; पुढचा सामना असेल ‘करा किंवा मरा’
- “…असा उन्मत्तपणा न्यायालयाकडे चालत नाही”, भातखळकरांचा सुभाष देसाईंना टोला
- “विरोधी पक्षनेते कितीही बोंबलले तरी…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- इतका आदर्श सामाजिक न्याय मंत्री आजवर राज्याला लाभला नाही; भातखळकरांचा धनंजय मुंडेंना टोला

