🕒 1 min read
मुंबई : परभणी येथे काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कुख्यात मटका किंग आबेद कासम पठाण याला पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे हा पक्षप्रवेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थित झाला. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘बेवडा कम्पनीचे भले केल्यानंतर आता मटकावाल्यांचे कोटकल्याण. नाना पटोलेंच्या उपस्थितीत औरंगाबादच्या मटका किंगचा काँग्रेसमध्ये प्रवेश’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
बेवडा कम्पनीचे भले केल्यानंतर आता मटकावाल्यांचे कोटकल्याण.
नाना पटोलेंच्या उपस्थितीत औरंगाबादच्या मटका किंगचा काँग्रेसमध्ये प्रवेश – https://t.co/RGyC1youHu
via @mataonline: https://t.co/TCX4xku4F8— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 18, 2022
दरम्यान, या पक्ष प्रवेशाचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून भाजपला गुंडाचा पक्ष म्हणून टीका करणाऱ्या काँग्रेसकडून मटका किंगला पक्षात प्रवेश देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…हे मन स्थिर असल्याचे लक्षण नाही”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- ‘तुम्ही खाताय ते शेण व आम्ही खातोय ते श्रीखंड’ असा भाजप नेत्यांचा कावा- संजय राऊत
- धोनीसोबत वादांच्या चर्चेवर गंभीरने पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाला…
- पोलीस व्यवस्थेस धमक्या द्यायच्या, ही कुठली रीत?- संजय राऊत
- IPL 2022: ‘आम्ही येथे काहीही सिद्ध करण्यासाठी खेळणार नाही’; स्पर्धेआधीच हार्दिकने स्पष्ट केली भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
