🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विविध मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच हे मन स्थिर असल्याचे लक्षण नाही, असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘मुंबै बँकेतील कर्जवाटप हे गौडबंगाल आहे. भाजपचे अनेक मंत्री व पुढारी या लुटीचे लाभार्थी आहेत. या बँकेचे सूत्रधार हे प्रविण दरेकरच होते. त्यांनी ‘मजूर’ नसतानाही मजूर संस्थेत ‘रंगारी’ असल्याचे प्रतिज्ञापत्रात दाखवले. बँकेचे संचालक व चेअरमन झाले व कर्जवाटप केले. आता हे सर्व बँक घोटाळा प्रकरण, फोन टॅपिंग, इतर घोटाळे बाहेर आले तेव्हा भाजपचे ‘उपरे’ पुढारी महाराष्ट्र पेटवायची भाषा करू लागले, हे आक्रितच म्हणायला हवे.’
दरम्यान, फोन टॅपिंग करण्यासाठी विरोधकांना दहशतवादी, चोर, लफंगे ठरविले हा एक गुन्हा व मुंबै बँकेत शासनाची, ठेवीदारांची फसवणूक केली हा दुसरा गुन्हा. इतरांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या सूडबुद्धीचे बळी व्हायचे व स्वतःवर वेळ आली की, राज्य पेटवायची भाषा करायची, हे मन स्थिर असल्याचे लक्षण नाही, असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
- अधिवेशनानंतर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक मार्ग काढू – शरद पवार
- रंग पोचवू शकतात डोळ्यांना इजा! जाणून घ्या कशी घ्यायची काळजी….
- “शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी..” – रावसाहेब दानवे
- अलियाच्या गंगूबाई काठियावाडीची क्रेझ आयफेल टॉवरपर्यंत; साडी नेसून महिलांनी केला भन्नाट डान्स!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
