🕒 1 min read
मुंबई: भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी कर्णधार मिताली राजनंतर महिलांच्या वनडेत २०० सामने खेळणारी दुसरी खेळाडू ठरली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेला विश्वचषक सामना हा गोस्वामीच्या कारकिर्दीतील २०० वा सामना आहे. झुलन याआधीच महिला वनडेत २५० विकेट्स घेणारी पहिली खेळाडू ठरली होती. आता तिचे नाव दिग्गज्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.
झुलन गोस्वामी तिच्या पाचव्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे, तिने २००५ मध्ये या स्पर्धेत पदार्पण केले होते. मागच्या सामन्यात भारताने दिलेल्या ३१८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने डावाच्या ३६व्या षटकात अनिसा मोहम्मदला बाद करून गोस्वामी महिलांच्या विश्वचषकात झुलन (jhulan goswami) सर्वाधिक विकेट (४०) घेणारी गोलंदाज बनली होती. अशा प्रकारे गोलंदाज फुलस्टन (३९ विकेट), कॅरोल हॉजेस (३७ विकेट) आणि क्लेअर टेलर (३६) आणि कॅथरीन फिट्झपॅट्रिक (३३) याना मागे टाकत तिने इतिहास रचला.
इंग्लंडविरुद्ध चकदा एक्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या झुलनने ब्युमॉंटला स्टंपसमोर पायचीत करत तिची २५० वी एकदिवसीय विकेट घेतली. आजच्या सामन्यात दुसरीकडे, मिताली (mitali raj) तिचा २३० वा एकदिवसीय सामना खेळत आहे. मिताली आणि झुलनने इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोट एडवर्ड्सने सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम मोडला आहे. सक्रिय खेळाडूंमध्ये, दक्षिण आफ्रिकेची मिग्नॉन डू प्रीझ या जोडीच्या सर्वात जवळ आहे, जिने १५० सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
- अधिवेशनानंतर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक मार्ग काढू – शरद पवार
- रंग पोचवू शकतात डोळ्यांना इजा! जाणून घ्या कशी घ्यायची काळजी….
- “शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी..” – रावसाहेब दानवे
- अलियाच्या गंगूबाई काठियावाडीची क्रेझ आयफेल टॉवरपर्यंत; साडी नेसून महिलांनी केला भन्नाट डान्स!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
