🕒 1 min read
मुंबई: आज (११ मार्च) महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कालच पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. चार राज्यांत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
“कोरोनापूर्व परिस्थितीशी तुलना करता दोन वर्षात देशाच्या GDP त 1.25% तर राज्याच्या GDP मध्ये 3.63% वाढ झाली. कोरोना संकटातही महाराष्ट्राने अर्थव्यवस्थेची चाके थांबू दिली नाहीत, उलट देशाच्या अर्थव्यवस्थेलाही गती दिली. हेच महाराष्ट्राचं वैशिष्ट्य अन वैभव आहे.”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
कोरोनापूर्व परिस्थितीशी तुलना करता दोन वर्षात देशाच्या GDP त 1.25% तर राज्याच्या GDP मध्ये 3.63% वाढ झाली.कोरोना संकटातही महाराष्ट्राने अर्थव्यवस्थेची चाके थांबू दिली नाहीत,उलट देशाच्या अर्थव्यवस्थेलाही गती दिली.हेच महाराष्ट्राचं वैशिष्ट्य अन वैभव आहे.#अर्थसंकल्प_ महाराष्ट्राचा_
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 11, 2022
तसेच आज सादर होणारं बजेट बेराजगार,शेतकरी,कामगार,महिला, युवक,नोकरदार,उद्योजक या सर्वच घटकांच्या अपेक्षा पूर्ण करणारं, शहरी-ग्रामीण भागाला न्याय देणारं व राज्याच्या विकासाला गती देणारं असेल, असा विश्वास आहे. असं सर्वसमावेशक बजेट सादर करण्यासाठी अजित दादांना मनःपूर्वक शुभेच्छा. असेही रोहित पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
गंभीर प्रश्नांकडे महाविकास आघाडीचे दुर्लक्ष, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचा आरोप!
-
“गेली ५० वर्ष आम्ही मुंबई पालिका लढतोय इथे भगवा कायम राहणार”, राऊतांचा इशारा
-
…हा विजय मिळवण्यामध्ये महाराष्ट्राच्या सेनेचा मोठा हात- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
