🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याचा निर्धार करणाऱ्या शिवसेनेचा पहिल्या दीड तासाच्या मतमोजणीत शिवसेनेच्या उमेदवारांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर फ्लॉप शो कायम असल्याची चर्चा आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभाही घेतली होती. मात्र त्याचा फारसा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसत आहे.
शिवसेनेच्या या परभवावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी चांगलीच खोचक टीका केली आहे. आशिष शेलार म्हणाले, इसवीसन २०२४ साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार, उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो.. उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा…झंझावाती दौरा… सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले… अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल हारले.. “एक मासो आणि खंडी भर रस्सो!”, अशा शब्दात शेलार यांनी ट्विट करत टीका केली आहे.
मा. अरविंद केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार होईल.. शिवाजी पार्कमध्ये हत्तीवरून युवराज साखर सुध्दा वाटतील…
शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की, पेढे वाटपाचे कार्यक्रम करुन दाखवले जातात..
“आपले नाही धड अन शेजाऱ्याचा कढ!”
2/— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 10, 2022
पुढे आणखी एक ट्विट शेयर करत शेलार म्हणाले, मा. अरविंद केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार होईल.. शिवाजी पार्कमध्ये हत्तीवरून युवराज साखर सुध्दा वाटतील… शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की, पेढे वाटपाचे कार्यक्रम करुन दाखवले जातात.. “आपले नाही धड अन शेजाऱ्याचा कढ!”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
निवृत्तीची घोषणा करताना श्रीसंत झाला भावनिक, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
-
अबब! कुठलाही अलंकार, व्याकरण कमी पडतंय; भाजपच्या यशावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
-
“…नव्या ऊर्जेने पुढे जायचे आहे”- प्रियंका गांधीची भावनिक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
