Share

Maharashtra Session 2022 : फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ आरोपानंतर सत्ताधाऱ्यांची आज भूमिका कोणती?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेनड्राइव्ह बॉम्ब टाकल्यानंतर आज (९ मार्च) सत्ताधारी कोणता पवित्रा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) सभागृहात उत्तर देऊ शकतात.

फडणवीस नेमके काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. ते म्हणाले की,”राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय विरोधकांची कत्तल करण्याचं कट कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. आणि याच ठिकाणी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कटही करण्यात आला.”

नेमके प्रकरण काय?

जळगावातील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!