🕒 1 min read
मुंबई: इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोच्या नाबाद शतकाने इंग्लिश संघाच्या ढासळत्या खेळीला सांभाळले आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्या दिवशी त्याने हा पराक्रम केला आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच ४ विकेट्स गमावलेल्या इंग्लिश संघाने ऍशेसमधली खराब कामगिरी विसरत पुनरागमन केले आहे.
इंग्लंड संघाने अँटिग्वा बेटावर नॉर्थ साऊंडमध्ये स्टंप संपल्यावर २६८-८ अशी मजल मारली. बेअरस्टो (jonny bairstow) (१०९) आणि ख्रिस वोक्स (chris woakes) (२४) यांनी दुसऱ्या नवीन चेंडूवर सहा षटके नाबाद राहिली. बेअरस्टोने त्याच्या आठ कसोटी शतकांपैकी सर्वात संथ शतक झळकावले आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध हे त्याचे पहिले शतक होते. बेअरस्टोच्या २१६ चेंडूत आलेल्या शतकात १७ चौकारांचा समावेश होता.
From 57-4 to 268-6 at the close
A strong response after the morning session ????
Match Centre: https://t.co/WxJPTcLfET
???? #WIvENG ???????????????????????????? pic.twitter.com/FUAaXvNMpQ
— England Cricket (@englandcricket) March 8, 2022
दिवस संपल्यानंतर जॉनी बेअरस्टोने शतकाबाबत आनंद व्यक्त करत सांगितले ” मी येथे काही टूरवर आलेलो आहे आणि स्वतःला भाग्यवान समजतो. हे एक भारी ठिकाण आहे. कोणत्याही कसोटी सामन्यात शतक झळकावायचे असते, पण खासकरून प्रवासी चाहत्यांसह जे काही वर्षांपासून येऊ शकले नाहीत, त्यांच्या साक्षीने शतक करणे खूप खास क्षण आहे.”
महत्वाच्या बातम्या
- women’s day : “महिलांना त्यांचे सर्व मूलभूत…”, तालिबानने दिलेल्या शुभेच्छा चर्चेत
- IPL 2022: गुजरात टायटन्सला जेसन रॉयची रिप्लेसमेंट सापडली; या खेळाडूची लागणार वर्णी!
- “मी चव्हाण वकिलांना भेटलो म्हणजे कुठल्या बाईला भेटलो का?”; अनिल गोटे संतापले
- “देवेंद्र फडणवीस खोटो आणि लबाड माणूस” ; राष्ट्रवादीच्या अनिल गोटेंचे टीकास्त्र
- “हे फक्त नौटंकी करत आहेत..”- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
