Share

पुणे मेट्रोचा पहिला प्रवासी होण्याचा मान मोदींना; मोबाईलवरुन काढले तिकीट

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी मोबाईलद्वारे मेट्रोचं तिकीट काढत पुणे मेट्रोने प्रवास करणारे पहिले प्रवासी होण्याचा बहुमान मिळाला. यादरम्यान मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचं उद्घाटन केले आणि मेट्रोला हिरवा झेंडाही दाखवला. त्यानंतर गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा पाच किलोमीटरचा प्रवास पंतप्रधान मोदींनी मेट्रोतून केला. यावेळी मोदींनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून पुणे मेट्रो प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतली.

मोदींचा जनतेशी संवाद 

मोदींना बघण्यासाठी, भेटण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. यावेळी मोदींनी गरवारे मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन प्रवासा शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोदींशी बोलण्यासाठी हे हि लहान मुलं खुपच उत्सुक होती. यावेळी लहान मुला मुलींनी पंतप्रधानांना अनेक प्रश्न विचारले. मोदींनी त्या प्रश्नांची उत्तर देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच मोदींनीतेथे उपस्थित असलेल्या दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचीही आस्थेवाईकपणे चौकशी केली. या मेट्रो प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ आणि मेट्रोचे अधिकारी देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!