🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आज पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आपण राजकारणात कसे आलो याचा किस्सा श्रीनिवास पाटील यांनी आज कार्यक्रमात सांगितला. “१९६५ साली मी अधिकारी झालो. ३४ वर्ष सरकारी नोकरीत राहून जनतेची सेवा केल्यावर १९९९ मध्ये मला माझ्या मित्राचा अचानक फोन आला. मी फोनवर बोलत असतानाच त्याने मला माझ्या शासकीय पदाचा राजीनामा द्यायला लावला. राजीनामा दिल्यावर दोन चार जॅकेट आणि दोन चोर टोप्या शिवून घे, असं सांगितलं तो मित्र म्हणजे शरद पवार होय.
“शरद पवार ठरवतील तीच राजकारणातील दिशा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी गेले २३ वर्ष राजकरणात काम केलं आहे. राजकारणात येऊन जनतेची जेवढी सेवा करणे शक्य असेल तेवढी केली. शरद पवार नेहमी म्हणतात कि, ८० टक्के समाजकारण करावे आणि २० टक्के राजकारण करावे”. असे देखील सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील आज पुण्यात म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- १५ लाख खात्यात जमा होण्यावरून राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका ; म्हणाले कि…
- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नला मिळाली होती बॉलिवूडची ऑफर…स्वतः दिला खुलासा
- “तेव्हा संजय राऊत कुठे होते? त्यांना याआधी कोणी ओळखत नव्हते”- गिरीश महाजन
- मग तुम्ही मेट्रोतून फिरून का आलात? गिरीश महाजनांचा शरद पवारांना सवाल
- IND VS SL : रवींद्र जडेजाचे दुहेरी शतक न होण्यामागे कोण?… रोहित की द्रविड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
