🕒 1 min read
पुणे : अवघ्या महाराष्ट्राला आपल्या अमोघ वाणीने वेड लावणारे राज ठाकरे दिनांक ७ मार्च सोमवार पासून पुणे दौऱ्यावर येणार आहेत. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा ठरणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इतर महत्वाच्या राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे, आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा पुणे मनपाच्या निवडणुकीसाठी तयारीला लागणार असल्याने पुणे शहरात राजकीय चुरस वाढली आहे.
७ मार्च पासून १० मार्च पर्यंत राज ठाकरे पुणे शहराच्या दौऱ्यावर असणार आहेत. यात पुणे आणि पिंपरी- चिंचवड या दोन शहरांचा राजकीय दौरा राज ठाकरे करणार आहेत. पुणे आणि पिंपरी- चिंचवड दौऱ्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सुद्धा पुणे शहरातील प्रसिद्ध गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन ९ मार्च रोजी असतो. यंदा प्रथमच मनसेचा वर्धापन दिन मुंबई शहराबाहेर साजरा करण्यात येणार असल्याने राज ठाकरे यांच्या या पुणे दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.
जसा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन प्रथमच मुंबई शहराच्या बाहेर साजरा करण्यात येणार आहे, तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या पोस्टरवर पहिल्यांदा अमित ठाकरे यांचा फोटो झळकणार आहे. अमित ठाकरे यांची नुकतीच मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अमित ठाकरे हे मनसेच्या वर्धापन दिनाच्या पोस्टरवर पहिल्यांदा झळकणे याला महत्व प्राप्त झाले आहे .
महत्वाच्या बातम्या :
- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नला मिळाली होती बॉलिवूडची ऑफर…स्वतः दिला खुलासा
- “तेव्हा संजय राऊत कुठे होते? त्यांना याआधी कोणी ओळखत नव्हते”- गिरीश महाजन
- मग तुम्ही मेट्रोतून फिरून का आलात? गिरीश महाजनांचा शरद पवारांना सवाल
- IND VS SL : रवींद्र जडेजाचे दुहेरी शतक न होण्यामागे कोण?… रोहित की द्रविड
- राष्ट्रीय OBC महासंघाचा आक्रमक पवित्रा; आरक्षण लढ्याची पुढची दिशा काय असेल?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
