🕒 1 min read
नवी दिल्ली : क्रिकेट जगतात ‘फिरकीचा जादूगार’ म्हणून ओळखला जाणारा शेन वॉर्न आज आपल्यात नाही.
शेन वॉर्नने वयाच्या 52 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाने क्रिकेटविश्व किंवा क्रिकेटप्रेमीच नव्हे तर बॉलिवूडलाही धक्का बसला आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या गोलंदाजीने फलंदाजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या शेन वॉर्नला बॉलिवूडमधूनही मोठी ऑफर मिळाली होती.
ज्याचा खुलासा त्याने स्वतः केला होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नचे शुक्रवारी त्याच्या थायलंड व्हिला येथे निधन झाले. 2015 मध्ये जेव्हा या चर्चांनी जोर धरला होता की, क्रिकेटच्या मैदानानंतर तो बॉलिवूडच्या पिचवर आपली नवी इनिंग सुरू करू शकतो, त्यानंतर त्याने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला होता. एका मुलाखतीदरम्यान शेन वॉर्नने खुलासा केला होता की, बॉलिवूडची एक मोठी ऑफर त्याची वाट पाहात आहे.
त्या वर्षाच्या शेवटी पीटीआयशी संवाद साधत त्याने म्हटलं होतं की, “एक प्रस्ताव आहे, एका व्यक्तीकडे माझ्यासाठी काहीतरी आहे.” तथापि, त्याची भारतातील लोकप्रियता आणि काही बॉलिवूड स्टार्सशी असलेले त्याचे चांगले संबंध पाहता, हे अजिबात आश्चर्यचकित करणारं नव्हतं. काही वर्षांनंतर शेनने खुलासा करत म्हटलं होतं की, ‘एक भारतीय प्रॉडक्शन हाऊस त्याच्या बायोपिकच्या निर्मितीसाठी बोलणी करत आहे. तथापि, नंतर कोरोना महामारीमुळे ते थांबवण्यात आले. त्यावेळी एका मुलाखतीदरम्यान शेन म्हणाला, मला वाटते की वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही ते पुन्हा सुरु करु आणि काय होते ते पाहू’. लिओनार्डो डिकॅप्रियो किंवा ब्रॅड पिट यांना चित्रपटात कास्ट करावे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली होती.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
