🕒 1 min read
मुंबई : आयपीएल क्रिकेट मध्ये खेळल्या जाणाऱ्या सर्व लीगमधून एक मोठी लीग मानली जाते. याचे कारण केवळ यात लागणारा पैसे नव्हे तर स्पर्धेतील खेळाडू आणि गुणवत्ता हि मोठे कारण ठरते. या वर्षापासून लीगमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या आणखी दोन संघांसह आयपीएल २०२२ हा मोठा हंगाम असणार आहे. आयपीएल हे जगभर गाजत असतानाच, आंतरराष्ट्रीय संघांवर त्याचा नकारात्मक परिणाम होण्यासाठी तो प्रत्येक वेळी दोषी धरला जातो. उदाहरणार्थ, या वर्षी ऍशेस गमावल्यानंतर, इंग्लंडचे माजी खेळाडू आणि तज्ञांनी असा युक्तिवाद केला की इंग्लिश खेळाडूंनी आयपीएलला प्राधान्य दिल्याने इंग्लंडमधील कसोटी क्रिकेटचा ऱ्हास झाला आहे असे सांगितले होते. यावर भारताचा स्पिनर आर अश्विनने टीका करणाऱ्या माजी खेळाडूंना सडेतोड उत्तर दिले आहे.
आर अश्विनने (R Ashwin) याबाबत त्याच्या युट्युब चॅनलवर सांगितले कि, “आयपीएल (IPL) गेली अनेक वर्षे रडारखाली आहे. अचानक, काही माजी क्रिकेटपटू विनाकारण आयपीएलबद्दल काहीतरी वाईट बोलतात. २००८ किंवा २०१० मधील परिस्थितीची कल्पना करा. टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय सेटअपमध्ये फक्त २० ते २५ क्रिकेटपटू होते.” आज क्रिकेटपटू अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये गुंतले आहेत आणि आयपीएल हा त्यांचाच एक भाग आहे, असा मुद्दा अश्विनने मांडला. अनेक जागतिक स्पर्धा, T20 लीग आणि देशांतर्गत लीग देखील आहेत. त्यामुळे आयपीएलला बाहेर काढणे योग्य नाही.
अश्विनने भारतीय क्रिकेटला आयपीएलचा कसा फायदा झाला याबद्दलही सांगितले. तो म्हणाला, “मी सुरुवात केली तेव्हाही, माझ्या आई-वडिलांनी आणि आजी-आजोबांनी मला विचारले की क्रिकेट मला आर्थिक मदत करेल का. १० वर्षांच्या कालावधीत केवळ १५ ते २० किंवा २५ क्रिकेटपटूंनाच संधी मिळेल. पण आता आयपीएलमुळे, येथे दरवर्षी किमान ७५ ते ८० भारतीय क्रिकेटपटूंना संधी मिळत आहे. हे केवळ आयपीएलवरच थांबत नाही. खेळाडूंना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळण्याची आणि तिथेही त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. त्याशिवाय, खेळाडूंना मीडिया, कोचिंग सेटअप किंवा इतर काही इकोसिस्टम सेटअपमध्येही संधी मिळते.हेच आयपीएलचे सर्वात मोठे यश आहे.”
महत्वाच्या बातम्या
- “सरकार चांगलं काम करतंय म्हणून अनेकांना अस्वस्थता”, शरद पवारांचा भाजपवर निशाणा
- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी किरीट सोमय्या दिल्ली दरबारी; चर्चांना उधाण
- “… आणि आम्ही ४ तास गप्पा मारल्या” विराट कोहलीसोबत भेटीच्या आठवणींचा जेमिमाहने केला खुलासा
- राष्ट्रवादीत वाजली टीक-टीक; भाजपची वाढली धड-धड
- “ईडीसारख्या संस्था भाजपची धुणीभांडी करणाऱ्या घरगड्यांप्रमाणे…”, राऊतांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
