🕒 1 min read
मुंबई: श्रीलंका विरुद्ध कसोटी मालिकेत निवड न झाल्याप्रकरणी रिद्धिमान साहाने राहुल द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले होते. तसेच त्याने निवडसमितीचे अध्यक्ष चेतन शर्मावरही आरोप लावले होते. आता या सगळ्या आरोपांसंबंधी बीसीसीआय साहाला प्रश्न विचारणार आहे. सोबतच त्याने या सर्व प्रकारात कराराचा अवमान केल्याचे आढळ्यास तो सस्पेंडही होऊ शकतो.
बीसीसीआयाने खेळाडूंसोबत करार केलेले असतात. याच कराराच्या एका कलमानुसार “खेळाडूने खेळ, अधिकारी, खेळात घडलेल्या घटना, तंत्रज्ञानाचा वापर, निवडीच्या बाबी किंवा खेळाशी संबंधित इतर कोणत्याही विषयावर कोणतीही टिप्पणी करू नये. BCCI चे मत कोणत्याही माध्यमात खेळ, संघ किंवा BCCI च्या हितासाठी प्रतिकूल आहे आणि/किंवा नाही…” आणि साहाने (wriddhiman saha) संघ निवडीबाबत गोष्टी उघड केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती देत बीसीसीआयचे ट्रेजरर अरुण धुमाळ यांनी सांगितले “होय, अशी शक्यता आहे की बीसीसीआय रिद्धिमानला विचारू शकेल की तो केंद्रीय करारबद्ध क्रिकेटपटू म्हणून निवड प्रकरणांवर कसा बोलला. जोपर्यंत अध्यक्षांचा (सौरव गांगुली ) प्रश्न आहे, त्यांनी त्याला प्रेरित करण्याचा प्रयत्न केला होता. प्रशिक्षक द्रविडसोबतचे ड्रेसिंग रूमच्या संभाषण त्याने सार्वजनिक का केले हे बोर्डाला जाणून घ्यायला आवडेल.”
महत्वाच्या बातम्या
- टेनिसला मिळणार नवा बादशाह..! युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू असताना रशियाच्या मेदवेदेवचा भीमपराक्रम
- भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार सज्ज
- पालकमंत्री बच्चू कडू जनता दरबारी; एकाच दिवशी अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न
- मुसलमान म्हणजे दहशतवाद्यांशी संबंध आहेच असं होत नाही- सना मलिक
- मुलाच्या अटकपूर्व जामीनासाठी किरीट सोमय्या दिल्लीत दाखल; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
