🕒 1 min read
नाशिक: राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ३ मार्च पर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. या सर्व प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपेने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.
नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व तालुका काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने येवल्यातील विंचूर चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आली. यावेळी मनमाड – नगर व नाशिक- औरंगाबाद महामार्ग रोखण्यात येऊन भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राज्यभरात चांगलेच वातावरण तापले असल्याचे दिसत आहे. एकीकडे भाजप नेत्यानी आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच महाविकास आघाडी मधील नेत्यांनी देखील निषेध आंदोलन करायला सुरुवात केली आहे. या प्रकरणी पुढे काय होणार याची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
संजू सॅमसन विश्वचषक संघात खेळणार?; कर्णधार रोहितची मोठी माहिती
-
‘ईडीची चौकशी फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांचीच का ?’ अंबादास दानवेंचा सवाल
-
…अशा धाडींमुळे काही लोकांना आसुरी आनंद होतोय- किशोरी पेडणेकर
-
“तुमचे लोक रोज गंगेत स्नान करतात अन् पाप करतात, त्यामुळे…” संजय राऊतांचा विरोधकांना खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
