Share

सचिन वाझेंची चौकशी आता सीबीआयच्या हाती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची चौकशी करण्यासाठी विशेष न्यायालयाने सीबीआयला (CBI) परवानगी दिली आहे. आता १५ आणि १६ फेब्रुवारीला नवी मुंबईतील तळोजा कारागृहात (Taloja Jail) त्याची चौकशी होणार आहे.

सचिन वाझे हा अँटिलिया विस्फोटके व व्यावसायिक मनसुख हिरन हत्या (Mansukh Hiren Murder Case) प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वाझे याने त्यांना दिलेल्या माहितीच्या आधारेच देशमुख यांच्याविरोधात शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप केले होते. त्या प्रकरणी सीबीआयने एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

विशेष पीएमएलए कोर्टाने (Special PMLA Court) सीबीआयला मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे माजी सहकारी संजीव पालांडे (Sachin Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांची चौकशी करण्याची परवानगी दिली. आता १६ आणि १७ फेब्रुवारीला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात त्यांची चौकशी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!