🕒 1 min read
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोना काळात पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी भ्रष्टाचार काढणाऱ्यांचा इलाज करू असे म्हटले होते. यावरूनच आता भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत टीका केली आहे.
“भ्रष्टाचार काढणाऱ्यांचा इलाज करू” हे मुख्यमंत्र्यांचे विधान केवळ धक्कादायकच नाही तर महाराष्ट्राचे प्रचंड दुर्दैव आहे. “ना खाऊंगा ना खाने दुंगा” म्हणणाऱ्या पंतप्रधानांचा शिवसेना द्वेष का करते तेच यातून स्पष्ट होते.”, असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे.
"भ्रष्टाचार काढणाऱ्यांचा इलाज करू" हे मुख्यमंत्र्यांचे विधान केवळ धक्कादायकच नाही तर महाराष्ट्राचे प्रचंड दुर्दैव आहे.
ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या पंतप्रधानांचा शिवसेना द्वेष का करते तेच यातून स्पष्ट होते. pic.twitter.com/5kqG194FJE— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 13, 2022
दरम्यान किरीट सोमाय्यांच्या आरोपांवरच आज संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. १५ तारखेला शिवसेनेची पत्रकार परिषद असून त्यापूर्वी काय फाईली दाखवायच्या त्या, दाखवाव्या. १५ तारखेला ४ वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद होणार, आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद होणार. असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “काही लोकांना भुंकण्याची सवय असते”, संजय राऊतांची किरीट सोमय्यांवर अप्रत्यक्ष टीका
- विराटवर प्रश्नचिन्ह उठताच रोहित म्हणाला “क्या बात कर रहे हो!”
- “हमको गिराते गिराते खुद गिर गये”, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका
- असदुद्दीन ओवेसींवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पिस्तुल विकणारा अटकेत
- “माणुसकी हाच खरा धर्म”, अनावश्यक मुद्द्यांवरून वाद घालणाऱ्यांनी हे समजून घ्यावं- रोहित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

